नवी दिल्ली । देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) म्हटले आहे की, त्यांच्या मंडळाने 14,000 कोटी रुपयांच्या बाजेल III कम्प्लायंट डेट इश्यू करण्यासाठी भांडवल उभारणीस मान्यता दिली आहे. भांडवल वाढविण्याबाबतच्या मंडळाची बैठक आयोजित केली असल्याचे SBI ने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे. बँकेने म्हटले आहे की, युएस डॉलर किंवा भारतीय रुपयांमध्ये (डॉलर / रूपये) बाजेल III कम्प्लायंट डेट इंस्ट्रूमेंट इश्यू करुन ते एडिशनल टियर-1 (AT-1) भांडवल वाढवेल.
एटी -1 बॉण्ड्सची मॅच्युरिटी डेट नसते
आर्थिक वर्ष 2022 दरम्यान SBI मार्फत सार्वजनिक ऑफर किंवा खासगी प्लेसमेंट केले जाईल. एटी -1 बॉण्ड्सना परपेचुअल बॉन्ड्स असे देखील म्हणतात. त्यांच्याकडे कोणतीही मॅच्युरिटी डेट नसते मात्र एक कॉल ऑप्शन असतो. अशा बॉण्ड्सचा जारीकर्ता कमी दरात भांडवल मिळाल्यानंतर बॉण्ड्सना कॉल करू शकतो किंवा पूर्तता करू शकतो. व्याजदर कमी होत असताना असे बऱ्याचदा केले जाते. बाजेल III कॅपिटल रेगुलेशनचे पालन करण्यासाठी जगभरातील बँकांना त्यांच्या भांडवलाच्या पद्धती सुधारण्याची आवश्यकता आहे.
SBI ग्राहकांना दिला इशारा
त्याच वेळी, स्टेट बँकेकडून अलीकडेच असे म्हटले गेले आहे की, ग्राहकांनी त्यांचे पर्मनंट अकाउंट नंबर (PAN) आणि आधार (Aadhar) 30 जून 2021 पूर्वी लिंक करावेत. यानंतर व्यवहारामध्ये अडचण येऊ शकते. इतकेच नाही तर त्याचा करंट अकाउंटवरही परिणाम होईल. वास्तविक, जर पॅन आणि आधार लिंक केले नाहीत तर पॅन निष्क्रिय होईल आणि ग्राहकांना व्यवहारामध्ये अडचणी येतील. ग्राहक त्यांचे पैसे काढू शकणार नाहीत. तसेच सरकारी योजनांचा लाभही मिळणार नाही की अनुदानही मिळणार नाही. तसेच पॅनकार्ड आधारशी लिंक केला नसेल तर कलम 234 H अंतर्गत तुम्हाला 1000 रुपये जास्त दंड आकारला जाईल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group