SBI Yono Lite युझर्सना करावा लागला विचित्र समस्येचा सामना; तुम्हालाही आली का ‘ही’ अडचण ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन YONO च्या युझर्सना आज एका विचित्र समस्येचा सामना करावा लागला. अनेक युजर्सने ट्विटरवर या समस्येबद्दल लिहिले. ज्यानंतर SBI ने या प्रकरणी लोकांना सांगितले की,”तांत्रिक समस्येमुळे युझर्सना त्रास झाला आणि या समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.”

वास्तविक, योनो युझर्सना त्यांच्या फोनवर चुकीच्या नोटिफिकेशन येत होत्या. शेकडो SBI योनो युझर्सनी त्यांच्या तक्रारी ट्विटरवर शेअर केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. एका ट्विटर युझरने लिहिले, ‘योनो एसबीआय अ‍ॅप मला लोन मेसेजसह स्पॅम करत आहे. कृपया याकडे लक्ष द्या आणि ते माझे नावही नाही. इथे काहीतरी चुकतंय.” हे लक्षात घ्या की, यावेळी यूझर्सना दुसऱ्याच्या नावाने नोटिफिकेशन मिळत होते. उदाहरणार्थ, तुमचे नाव तुषार वालगुडे असेल तरीही तुम्हाला अक्षय पाटील असा मेसेज पाठवला जात होता.

दुसर्‍या एका युझरने SBI च्या अधिकृत हँडलला टॅग करताना लिहिले की, “Yono Lite SBI इन्स्टंट पर्सनल लोनसाठी अनेक रँडम नावांसह नोटिफिकेशनचे स्पॅमिंग करत आहे. कृपया याकडे लक्ष द्या.”

समस्या लवकर दूर करण्याचा प्रयत्न
याबाबत अनेक तक्रारी मिळाल्यानंतर, SBI ने एक निवेदन जारी करत म्हंटले कि, “तांत्रिक त्रुटीमुळे, काही युझर्सना योनो लाइट अ‍ॅप्लिकेशनमध्ये चुकीचे नोटिफिकेशन मेसेजेस मिळत आहेत. आम्ही शक्य तितक्या लवकर या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहोत.”

SBI फक्त Yono नावाचे अ‍ॅप आणत आहे
SBI ने काल गुरुवारी सांगितले होते की, ते एका वेगळ्या डिजिटल एंटिटीची योजना आखत आहे आणि भविष्यासाठी तयार होण्यासाठी सध्याचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन ‘Only Yono’ हे नाव देईल. SBI 12-18 महिन्यांत सुधारणा लागू करण्याचा विचार करत आहे, ज्यात सध्याच्या YONO ग्राहकांना केवळ YONO मध्ये मायग्रेट करणे सामील आ

Leave a Comment