गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदियामध्ये स्कूल व्हॅनचा भीषण अपघात (school bus accident) झाला आहे. हि स्कूल व्हॅन तब्बल तीस फूट खोल खड्ड्यात पडल्यामुळे तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच व्हॅनचा चालक गंभीर जखमी झाला आहे. या व्हॅनमध्ये विद्यार्थी नसल्यानं फार मोठी दुर्घटना (school bus accident) टळली आहे. ही व्हॅन एसेंट पब्लिक स्कूल राणी अंतीबाई चौक येथील आहे. हि व्हॅन सकाळी तेरा विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परत जात असताना हा अपघात (school bus accident) झाला आहे. गोंदिया येथील रिंग रोड बायपासचा पूल उतरताना गाडीचा स्टेरींग लॉक झाल्यामुळे हा अपघात (school bus accident) झाला आहे. या अपघातात गाडी चालक भूमेस्वर लांजेवार हा जखमी झाला आहे.
नेमके काय घडले?
व्हॅलचालक भूमेश्वर लांजेवार हा नेहमीप्रमाणे मुलांना शाळेत सोडून परतत होता. त्यामुळं व्हॅनमध्ये विद्यार्थी नव्हते. गोंदिया येथील रिंग रोड बायपासचा पूल उतरताना व्हॅनचे स्टेरींग लॉक झाले. त्यामुळं हा अपघात (school bus accident) झाला. रस्त्याच्या खाली असलेल्या बांधात ही व्हॅन कोसळली. या अपघातात (school bus accident) व्हॅन चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठा अनर्थ टळला
या व्हॅनमध्ये तेरा विद्यार्थी रोज प्रवास करतात. विद्यार्थी व्हॅनमध्ये असते तर मोठा अनर्थ (school bus accident) घडला असता. सुदैवाने विद्यार्थ्यांना सोडून परतत असताना हा अपघात (school bus accident) झाला. यापुढं चालकानं आधी व्हॅन व्यवस्थित करून घ्यावी. त्यानंतरच मुलांना बसवावं, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!||
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?