शहरातील शाळांना अखेर मुहूर्त मिळाला; ‘या’ तारखेपासून वाजणार घंटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा येत्या 20 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडे यांनी घेतला आहे. त्यामुळे तब्बल पावणे दोन वर्षानंतर शहरातील प्राथमिक विभागाच्या शाळा गजबजणार आहेत.

कोरोना व लॉकडाऊन मुळे राज्यातील प्राथमिक शाळा 16 मार्च दोन हजार वीस पासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने 1 डिसेंबर पासून प्राथमिक शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. मात्र ओमायक्रोनचा धोका लक्षात घेता शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय 10 डिसेंबर नंतर घेण्यात येणार असल्याचे प्रशासकांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल त्यांनी 20 डिसेंबर पासून शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका व खाजगी शाळांना सूचना देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी रामनाथ चौरे यांनी सांगितले.

शहरात मनपाच्या 71 तर 875 खाजगी शाळा आहेत. शाळा कधी सुरू होणार याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी मागील वर्षापासून ऑनलाइन शिक्षण घेत होते. आता त्यांची यातून मुक्तता होणार आहे. पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत नेहमीप्रमाणे ऑफलाइन शिक्षण मिळेल.

Leave a Comment