स्कॉर्पिओ आणि अल्टोची समोरासमोर भीषण धडक; 2 भाविक जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगरमध्ये मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन भाविकांवर काळाने घाला घातला आहे. औरंगाबाद-बारामती राज्य मार्गावर भरधाव स्कॉर्पिओ आणि अल्टो कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (car accident) 2 भाविक जागीच ठार झाले आहेत. पाथर्डी तालुक्यातील काळेगाव शिवारात औरंगाबाद बारामती राज्य मार्गावर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा भीषण अपघात car accident) झाला.

काय घडले नेमके?
मारुती अल्टो कारमधील भाविक हे त्यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील चित्ते पिंपळगाव या ठिकाणी मोहटा देवीचे दर्शन घेऊन घरी परतत होते. तर अमरापूर कडून एक भरधाव स्कॉर्पिओ गाडी त्या दिशेने येत होती. काळेगाव शिवारात पोहोचले असता स्कॉर्पिओ गाडीने अल्टो कारला समोरून जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि यामध्ये अल्टो कारचा पूर्णपणे चुराडा (car accident) झाला आहे.

या अपघातात अल्टो कारमधील अप्पासाहेब रंगनाथ गावंडे, गंगुबाई गोरखनाथ झिंजुर्डे हे दोघेजण जागीच ठार झाले. तर भक्ती बाबसाहेब झिंजूर्डे, माधुरी गणेश झिंजुर्डे, अमोल गोरखनाथ झिंजूर्डे, गणेश गोरखनाथ झिंजूर्डे, तजेस गणेश झिंजूर्डे हे पाच जण या अपघातात (car accident) जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर