नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने (Heavy Rain) आता आपले रौद्र रूप धारण केले आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी परिस्थिती खूप बिकट आहे. या पावसाने (Heavy Rain) आतापर्यंत 76 जणांचा बळी घेतला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हि माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये लोकांच्या डोळ्यांसमोर एक कार पाण्यात वाहून जाताना दिसत आहे. हि कार वाहून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
मागच्या दोन तीन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. त्यामुळे नद्यानाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदागोमुख मार्गावरील पुलावरुन स्कार्पियो वाहन वाहुन गेल्याची घटना घडली आहे. या गाडीमध्ये 5 ते 6 प्रवासी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारी 3 वाजता हि घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
सर्वांच्या डोळ्यासमोर वाहून गेली स्कार्पियो! त्यामध्ये 5 ते 6 लोक असण्याची शक्यता pic.twitter.com/zjLr6PTQa1
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 12, 2022
सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. त्यामुळे नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. तर काही ठिकाणी याच मुसळधार पावसामुळे राज्यात दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी धरणे प्रचंड भरल्याने त्यांचे दरवाजे खोलण्यात आले आहेत.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार