औरंगाबाद | ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत संचारबंदी लावण्यात आली होती. तेव्हा फक्त होम डिलिवरीला परवानगी असताना सुद्धा काउंटर सेल करत मद्य विक्री करणारे 35 दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केली होती.
7 जूनला संपूर्ण शहर अनलॉक झाले. त्याचबरोबर विक्रीला सुद्धा परवानगी मिळाली. परंतु सिल केलेल्या दुकानांना परवानगी मिळाली नव्हती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या समोर सुनावणी झाल्यानंतर मंगळवारी सिल केलेली 35 दुकाने सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. कदम यांनी दिली आहे.
कदम म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यात 534 बार, 112 बियर शॉपी, 120 देशी दारू दुकाने आणि 31 वाईन शॉप आहे. त्यापैकी 35 दुकाने सील करण्यात आली होती. त्याचबरोबर चिकलठाणा शेंद्रा वाळूज आणि गंगापूर येथे दारूच्या दहा कंपन्या आहे. संचार बंदीच्या काळात शहरात नियम घातलेले तोडणाऱ्या वर कारवाई करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्वच दुकाने सुरू झाली आहेत. असे असले तरी मद्य विक्रेत्यांना कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.