प्रकाश जावडेकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत आगामी विधानसभेच्या निवडणूकीतील जागावाटप आणि कोस्टल रोडसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जावडेकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

मातोश्रीवर झालेल्या भेटीत लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठी युती करण्यावर तसेच जागा वाटप फॉर्म्यूल्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकांतही भाजप व शिवसेना यांच्यात युती व्हावी, असे भाजप नेतृत्वाचे म्हणणे आहे. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये जागावाटप कशाप्रकारे व्हावे याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी युती जाहीर करतानाच आगामी विधानसभा निवडणूकीत निम्म्या-निम्म्या जागांचे वाटप करण्याचे ठरले होते. त्या निम्म्या जागा कोणत्या असाव्यात. त्यांचे निकष काय असावेत यावरून सध्या शिवसेना-भाजपत चर्चा सुरू आहे. लोकसभेच्या जागावाटपाच्यावेळी शिवसेनेकडून सुभाष देसाई तर भाजपकडू प्रकाश जावडेकर चर्चा करत होते. त्यामुळे विधानसभेसाठीही जागावाटपासंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून जावडेकर यांना पाठविण्यात आल्याचे समजते. मात्र याबाबत दोन्ही पक्षांकडून कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही.

Leave a Comment