Capital Money Mantra वर SEBI ने घातली बंदी, आता गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे लागणार; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मार्केट्स नियामक सेबीने आर्थिक सल्लागार कंपनी कॅपिटल मनी मंत्र (Capital Money Mantra) आणि त्याचा मालक गौरव यादव (Gaurav Yadav) यांच्यवर दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. सेबी (SEBI) च्या आदेशानुसार, Capital Money Mantra आणि त्याचे मालक यापुढे दोन वर्षांसाठी सिक्युरिटीज मार्केटमध्ये एंटर करू शकणार नाहीत आणि कोणतेही ट्रेडिंग करू शकणार नाहीत. परवानगी न घेता गुंतवणूकदारांना बेकायदेशीरपणे गुंतवणूकीच्या सूचना दिल्याचा आरोप Capital Money Mantra वर आहे.

सेबीने Capital Money Mantra ला आपल्या ग्राहकांना गुंतवणूकीच्या टिप्स देण्यासाठी जमा केलेली फी परत करण्याचे आदेशही दिले आहेत. सेबीने सांगितले की,” या कन्सल्टन्सी फर्मने नियामकाकडे रजिस्ट्रेशन न करता लोकांना गुंतवणूकीच्या टिप्स दिल्या. Capital Money Mantra चे मालक गौरव यादव यांनी ऑक्टोबर 2015 ते जुलै 2017 दरम्यान लोकांना गुंतवणूकीच्या टिप्स देऊन 65 लाख रुपये कमावले. आता त्याला हे पैसे तुमच्या ग्राहकांना परत करावे लागतील.

गुंतवणूकदारांचे तीन महिन्यांत पैसे परत करावे लागतील
सेबीने सांगितले की,” त्याला हे पैसे आपल्या गुंतवणूकदारांना 3 महिन्यांत परत करावे लागतील. ज्या दिवशी कंपनी संपूर्ण पैसे गुंतवणूकदारांना परत करेल त्या दिवसा पासून Capital Money Mantra आणि त्याचा मालक पुढील दोन वर्ष कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाहीत. तसेच, त्यांना कोणत्याही लिस्टेड कंपनी किंवा इंटरमीडियरी सह व्यवसाय करता येणार नाही.

फ्रँकलिन टेम्पलटन MF वरही दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती
अलीकडेच सेबीने फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाच्या बाबतीत कठोर भूमिका घेत फ्रँकलिन टेंपलटन MF ला दोन वर्षांसाठी नवीन योजना सुरू करण्यास बंदी घातली. इतकेच नाही तर सेबीने 5 कोटींचा दंडही लादला आहे. सेबीने असेही निर्देश दिले आहेत की, कंपनीच्या सर्व सहा बंद योजनांमध्ये आकारण्यात आलेली इंवेस्टमेंट मॅनेजमेंट फी परत करावी. सेबीच्या सूचनेनुसार 4 जून 2018 ते 23 एप्रिल 2020 पर्यंत कंपनीला ही फी 12 टक्के व्याजासह परत करावी लागेल. फ्रँकलिन टेंपलटन हेड, एपीएसी डिस्ट्रीब्यूशन विवेक कुडवा आणि त्यांची पत्नी रुपा कुडवा यांना सेबीने एका वर्षासाठी बाजारात ट्रेडिंग करण्यास बंदी घातली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment