नवी दिल्ली । PNB हाऊसिंग फायनान्सने गुरुवारी सांगितले की,” बाजार नियामक सेबीने 4000 कोटी रुपयांचे इक्विटी भांडवल उभारण्याच्या कंपनीच्या योजनेसंदर्भात सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनल (SAT) च्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.”
PNB हाऊसिंग फायनान्सने स्टॉक एक्सचेंजला सांगितले,”आमच्या लक्षात आले आहे की, सेबीने SAT (Securities Appellate Tribunal) च्या आदेशाविरोधात भारताच्या सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.
कंपनी सेबीने दाखल केलेल्या अपिलाची तपासणी करत आहे. याआधी 9 ऑगस्ट रोजी SAT ने 4,000 कोटी रुपयांच्या कार्लाइल ग्रुपच्या प्रस्तावित करारात PNB हाऊसिंग फायनान्स आणि बाजार नियामक सेबी यांच्यात सुरू असलेल्या वादावर खंडित निकाल दिला.
न्यायाधिकरणाने असेही म्हटले आहे की,” त्यांनी 21 जून रोजी अंतरिम आदेश दिला. त्या आदेशात, पीएनबी हाऊसिंग फायनान्सला भांडवल उभारणीच्या योजनेवर भागधारकांच्या मताच्या परिणामाबद्दल माहिती देऊ नये असे सांगण्यात आले होते, तो आदेश लागू राहील.” सेबीने प्रस्तावित कराराच्या मूल्यांकनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. PNB हाऊसिंग फायनान्सने नियामकाने जूनमध्ये दिलेल्या निर्देशाविरोधात SAT मध्ये अर्ज केला होता.
31 मे रोजी पंजाब नॅशनल बँकेची हाउसिंग फायनान्स कंपनी PNB हाऊसिंग फायनान्सने फंड उभारणीची योजना जाहीर केली. तथापि, एका प्रॉक्सी एडव्हायझरी फर्मने प्रेफरन्स शेअर्स जारी करून फंड उभारण्याच्या या योजनेविरोधात प्रश्न उपस्थित केले. प्रॉक्सी एडव्हायझरी फर्मने म्हटले आहे की,” हा करार अल्पसंख्याक भागधारकांच्या बाजूने नाही.”