हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cafe Coffee Day : 24 जानेवारी रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीकडून कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडला 26 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे जाणून घ्या कि, कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड (CDEL) ही भारतीय कॉफी रेस्टॉरंट चेन कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) ची मूळ कंपनी आहे. यासोबतच सेबीकडून कंपनीला 3,424 कोटी रुपयांच्या थकबाकी देण्यासाठी NSE सोबत सल्लामसलत करून कायदेशीर संस्था नियुक्त करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
SEBI कडून या कंपनीला कायद्याच्या कलम 15HA अंतर्गत 25 कोटींचा तर 15HB अंतर्गत 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यातील पहिला विभाग हा बेकायदेशीर व्यावसायिक घडामोडींशी संबंधित आहे तर दुसरा भाग हा दंडाच्या तरतुदीशी संबंधित आहे. Cafe Coffee Day
संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
या प्रकरणी आतापर्यंत समोर आलेली माहिती अशी की, कंपनीचे मालक असलेल्या सिद्धार्थ यांनी कॉफी डेच्या 7 उपकंपनी युनिट्सच्या खात्यामधून 3535 कोटी रुपये काढून ते आपली खाजगी कंपनी असलेल्या म्हैसूर अमलगमेटेड कॉफी इस्टेट लिमिटेड (MACEL) मध्ये टाकले. MACEL वरील खाजगी गुंतवणूकदारांची थकबाकी द्यावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र, कागदोपत्री यामधील फक्त 842 कोटी रुपये काढण्यात आल्याचे दाखवण्यात आले असून उर्वरित 2693 कोटी रुपयांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच आतापर्यंत या थकबाकीपैकी फक्त 110 कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. या प्रकरणी नाराजी व्यक्त करत सेबीने हे पाऊल उचलले आहे. Cafe Coffee Day
2019 मध्ये सिद्धार्थने केली आत्महत्या
हे जाणून घ्या कि, कॉफी डेचे संस्थापक असलेल्या व्ही.जी. सिद्धार्थ यांनी 2019 मध्ये नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. 2 दिवस बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपण बराच काळ लढलो मात्र आता पराभव स्वीकारत असल्याचे म्हटले होते. Cafe Coffee Day
कॉफी डेवर 7200 कोटींची थकबाकी
कॉफी डे एंटरप्रायझेसवरही 7200 कोटींची थकबाकी होती. मात्र मालमत्ता विकून ती आता कमी झाली आहे. कंपनीने बेंगळुरूमधील टेक पार्क विकून 2700 कोटी रुपये आणि टेक कंपनी माइंड ट्रीचे शेअर्स विकून 1800 कोटी रुपये उभे केले. ज्याद्वारे कर्ज फेडण्यात आले. आता कॉफी डेवर सुमारे 3200 कोटी रुपयांची थकबाकी आहे. Cafe Coffee Day
कंपनीबाबत जाणून घ्या
कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड ही कॉफी डेची मूळ कंपनी आहे. ही कंपनी मुख्यत्वे उपकंपनी, सह-अॅप आणि जॉइंट व्हेंचर कंपन्यांच्या माध्यमातून रिटेल कॉफी आणि निर्यात, कमर्शिअल ऑफिस स्पेस भाड्याने देणे, फायनान्स, मल्टीमॉडल लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी आणि IT मध्ये व्यवसायात गुंतलेली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cafecoffeeday.com/
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये