औरंगाबाद – शहरातील सिग्नलवर भीक मागण्यासाठी दोन लहान मुलांना दोन महिला अमानुष मारहाण करत असल्याचा चिमुकल्यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर औरंगाबाद पोलीस आता सक्रिय झाले आहेत. त्यांनी देऊळगाव मही येथून एका संशयित महिलेस 4 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आहे.
देऊळगाव मही येथील दिग्रस रोड वरील एका महिलेस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अखिल काजी व राजू मोरे यांनी ताब्यात घेत चौकशी साठी औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. भीक मागण्यासाठी एक वृद्ध महिला व अन्य एक महिला अमानुष मारहाण करून छळ करत असल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. या व्हिडिओ मधील चिमुकला मुलगा देऊळगाव मही, अकोला आणि राजस्थानचे नाव घेत आहे.
दरम्यान सुमारे पाच ते सहा वर्षाच्या मुलाचे दोन वर्षाच्या मुलाला मारहाण होत असल्याची घटना औरंगाबाद मधील एका महिलेच्या निदर्शनास आली. तिचे नातेवाईक असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या याबाबत माहिती दिली. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याने आवाज उठवल्यानंतर औरंगाबाद येथील जनाबाई जाधव सविता पगारे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही चिमुकल्या मुलांना त्या दोन महिलांनी विकत घेतले असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. ही दोन्ही मुले अकोला व जालना जिल्ह्यातील असून काही दिवस देऊळगाव मही येथील एका कुटुंबाकडे ते राहिले असल्याचे समाजमाध्यमांवरील चित्र फीतीतून समोर येत आहे. या अनुषंगानेच देऊळगाव मही येथून एका संशयित महिलेचे 4 सप्टेंबर रोजी ताब्यात घेत औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.