Monday, January 30, 2023

ट्विटरच्या फांद्यांवरून उतरून मैदानात यावं सरकारला भांडावून सोडावं ,सेनेचा राहुल गांधींवर निशाणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेस पक्षाने पुढचा काळ प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करा व सध्याच्या सरकार विषयी लोकांच्या मनात रोष निर्माण होतो आहे. बेरोजगारी, अर्थ संकट, महागाई, कोरोना मुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घसरणीला आली आहे. अशा वेळी देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ट्विटरच्या फांद्यांवरून खाली उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे पुन्हा मैदानावर उतरणार म्हणजे करोना काळात गर्दी करणार नाही तर सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचं महत्त्वाचं काम सर्वच विरोधी पक्षांना रोज करावं लागेल काँग्रेस ने त्या कामी पुढाकार घ्यावा सोनियांना बहुधा हाच संदेश द्यायचा असावा असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

अध्यक्ष असला नसला तरी पक्ष चालत असतो

- Advertisement -

सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून ते रिकामेच आहेत. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचं मत काँग्रेस मधील जी23 गटानं मांडलं आहे. पक्षाला अध्यक्ष नसल्याने लोकांसमोर जायचे कसे हा मुद्दा या बंडखोर गटाने उपस्थित केला पण अध्यक्ष असला नसला तरी पक्ष हा चालत असतो. जमिनीवरचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा पुढे नेत असतात. एक काळ असा होता की काँग्रेसने निवडणुकीत दगड उभा केला तरी लोक त्या दगडास निवडून देत होते आज चित्र तसं नाही. सोनिया गांधी यांनी कार्य समितीच्या बैठकीत तोच मुद्दा उपस्थित केला असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी पण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्‍न , पण सोनिया गांधी ‘सामना’ ची दखल घेतात हे काल पुन्हा सिद्ध झाले आहे. काँग्रेसला आसाम, केरळ मध्ये सत्तेवर का येता आलं नाही? हा प्रश्नच सामना या स्तंभातून विचारलाय.

राहुल गांधी हेच काँग्रेसचे सेनापती

सामनाच्या आग्रलेखात पुढे म्हंटले आहे की, ते तिघेही माझी काँग्रेसवाले आहेत पण जिथे गेले तिथे त्यांनी स्वतःचे अस्तित्व अधिक तेजोमय केले. ममता बॅनर्जी यांनी मोदी शहांच्या बलाढ्य सत्तेशी लढा देऊन विजय प्राप्त केला. त्यांचा मूळ पिंड काँग्रेसचाच आहे. ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचा त्याग करतात पश्चिम बंगालातील काँग्रेसचा डोलाराच कोसळला. काँग्रेस म्हणजे कधीकाळी स्वातंत्र्य आणि संघर्ष होता. आज राहुल गांधींचा लढा एकाकी आहे. राहुल गांधी हे त्यांचे काम संयमानं करतात त्यांच्यावर प्रचंड टीका घाणेरड्या शब्दात होत असताना ते त्यांच्या मुद्द्याला धरून लढत राहतात. कोरोना काळात राहुल गांधी यांनी घेतलेल्या अनेक मुद्द्यांवर सरकार पक्षाकडून टीकेची झोड उठली पण लसीकरणापासून पुढे इतर अनेक विषयात सरकारने राहुल गांधीची भूमिका स्वीकारली. राहुल गांधी हेच काँग्रेसचे सेनापती आहेत त्यांचे सरकार वरील हल्ले अचूक असतात. जगभरातून हिंदुस्थानला जी परदेशी मदत मिळू लागली आहे त्यावर सरकारची छाती अकारण फुगली तेव्हा पडलेल्या छातीचा फुगा राहुल गांधी यांनी सहज फोडला. विदेशी मदतीचा गवगवा करणे म्हणजे राष्ट्राभिमान किंवा स्वाभिमान नाही असं ते म्हणाले व त्यावर राष्ट्रीय मंथन झाल्या काँग्रेस पक्षानं पुढचा काळ प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करा व सध्याच्या सरकार विषयी लोकांच्या मनात रोष निर्माण होतोय असे सामनाच्या आग्रलेखात म्हंटले आहे.