Monday, February 6, 2023

दाक्षिणात्य स्टायलिश स्टार अल्लू झाला कोरोनामुक्त, १५ दिवसांनी घेतली कुटुंबाची भेट; पहा व्हिडीओ

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. आधीच्या लाटेपेक्षा कोरोनाची हि लाट अत्यंत भयावह आहे. या लाटेत अनेक लोकांनी आपले जीव गमावले आहेत. दरम्यान अनेक कलाकारानाही कोरोनाची लागण झाली आहे. यातील काही कलाकारांनी सिनेसृष्टीला हादरा देत जगाचा निरोप घेतला आहे. यामुळे सध्याची परिस्थिती भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. मात्र यात दिलासा देणारे वृत्त असे कि अनेकांनी कोरोनावर मातदेखील केली आहे. यात अनेक कलाकारांचा समावेश आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार प्रेक्षकांचा आवडता अभिनेता दाक्षिणात्य स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन याने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. याबाबतची माहिती खुद्द अल्लूनेच दिली आहे. सोबतच आपल्या कुटुंबाला भेटताना विशेष करून आपल्या चिमुकल्यांचे भेटतानाचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

- Advertisement -

या व्हिडिओत अल्लू दरवाज्यातून आत जाताना दिसतो. सोबतच त्याची लहान मुले त्याला पाहून आनंदी होत त्याच्याकडे धाव घेताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्याने लिहिले कि, निगेटिव्ह आल्यानंतर कुटुंबाला भेटलो तब्बल १५ दिवसाच्या क्वारंटाईननंतर. मुलांना खूप मिस केलं. सोबतच अल्लूने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे.

ज्यात लिहिले आहे कि, हॅलो सगळ्यांना. १५ दिवस क्वारंटाईन झाल्यानंतर आज माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी माझ्या सर्व चाहत्यांचे आणि शुभचिंतकांचे त्यांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि माझ्यावरील प्रेमासाठी आभार मानू इच्छितो.. आशा आहे कि हा लॉकडाऊन आपल्याला दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोना केसेस कमी करण्यासाठी मदत करेल. घरी राहा.. सुरक्षित राहा.. तुमच्या प्रेमासाठी खूप खूप आभार.. यासोबतच त्याने कॅप्शनमध्येसुद्धा असेच लिहिले आहे कि, हॅलो सगळ्यांना.. माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मी आता बरा आहे. आपल्या प्रेमासाठी खूप खूप आभार.

 

काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली होती. याबाबतची माहिती देखील अल्लूने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांना दिली होती. यानंतर त्याच्यावर डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे योग्य ते उपचार चालू होते आणि तो आयसोलेशन मध्ये होता. मात्र आता तब्बल १५ दिवसानंतर अल्लू कोरोनमुक्त झाला आहे. याबाबतची माहितीदेखील त्याने सोशल मीडियाद्वारे दिली असता त्याच्या चाहत्यांमध्ये अनोखा उत्साह आला आहे. सगळे सोशल मीडियाद्वारे आनंद व्यक्त करीत आहेत.