नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच्या चढ-उतारानंतर सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांनी मार्केट कॅपमध्ये वाढ नोंदविली आहे. गेल्या व्यावसायिक आठवड्यात या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 2,41,177.27 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या यादीचा सर्वाधिक लाभ एचडीएफसी बँक आणि RIL ला मिळाला. मागील आठवड्यात बीएसईचा सेन्सेक्स 1,807.93 अंक किंवा 3.70 टक्क्यांनी वधारला आहे. टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये फक्त हिंदुस्तान युनिलिव्हर लि. (HUL) ची मार्केट कॅप घटली.
गेल्या आठवड्यात एचडीएफसी बँकेच्या मार्केट कॅपमध्ये 60,584.04 कोटी रुपयांची वाढ झाली असून त्यानंतर कंपनीची मार्केट कॅप 8,25,619.53 कोटी रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ची मार्केट कॅप 40,604.13 कोटी रुपयांनी वाढून 12,68,459.17 कोटी रुपये झाली.
या कंपन्यांची देखील M-Cap वाढली
भारतीय स्टेट बँक (SBI) ची मार्केट कॅप 36,233.92 कोटी रुपयांनी वाढून 3,57,966.17 रुपये झाले. तर आयसीआयसीआय बँकेची मार्केट कॅप 31,319.99 कोटी रुपयांनी वाढून 4,44,563.06 कोटी रुपयांवर पोहोचली. बजाज फायनान्सची मार्केट कॅप 18,279.85 कोटी रुपयांनी वाढून 3,39,871.90 कोटी रुपये झाली. याशिवाय एचडीएफसीची मार्केट कॅप 16,983.46 कोटी रुपयांनी वाढून 4,53,863.21 कोटी रुपयांवर गेली.
इन्फोसिसची मार्केट कॅप 16,148.39 कोटी रुपयांनी वाढून 5,77,208.83 रुपये झाले आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची मार्केट कॅप 10,967.68 कोटी रुपयांनी वाढून 11,39,455.78 कोटी रुपये झाले. कोटक महिंद्रा बँकेची मार्केट कॅप 10,055.81 कोटी रुपयांनी वाढून 3,48,414.61 कोटी रुपये झाले.
HUL ची मार्केट कॅप ड्रॉप
त्याशिवाय HUL ची मार्केट कॅप 3,777.84 कोटी रुपयांनी घसरून 5,54,667.44 कोटींवर गेले.
RIL टॉप वर
मार्केट कॅपच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज टॉपवर आहे. त्यापाठोपाठ अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचयूएल, एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्सचा क्रमांक लागतो.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा