मेट्रोच्या पिलरचे काम सुरु असताना मुंबईत घरं कोसळली, घटना CCTV मध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुंबईत पुन्हा एकदा घर कोसळल्याची (Houses collapsed) घटना घडली आहे. मेट्रो पिलर चे काम सुरू असताना शेजारीच असलेल्या चाळीतील काही घरे आणि भिंती कोसळल्याची (Houses collapsed) धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंधेरी पश्चिम येथे मेट्रोचे काम सुरू असतानाच बाजूलाच असलेल्या मिठीबाई कॉलेज जवळ चाळीतील भिंती आणि काही घरे (Houses collapsed) अचानक कोसळल्याने त्या परिसरात एकच खळबळ उडाली. तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्याला सुरुवात केली. ढिगाऱ्याखालून बचाव पथकाला नागरिकांना काढण्यात यश आले आहे.

मेट्रोच्या पिलर चे काम सुरू असल्याने व्हायब्रेशन मुळे नाल्याजवळील जवळपास सात घरे कोसळल्याची (Houses collapsed) प्रथम दर्शनी माहिती समोर आली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. ही घटना घडण्याआधीच काही स्थानिकांना घटनेचा अंदाज आल्याने तेथील उपस्थित 24 कुटुंबांना बीएमसीच्या शाळेत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

हे पण वाचा :
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
SSC CGL अंतर्गत 20,000 जागांसाठी बंपर भरती
‘या’ multibagger stock ने फक्त 25,000 रुपयांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये