सोलापूर प्रतिनिधी । आज राज्यभर लोकशाहीचा जागर सुरु आहे. विधानसभेच्या जागांवर राज्यातील मतदार आपला कौल मतदानाच्या माध्यमातून नोंदवत आहे. या सर्वात सोलापूर मध्ये एक निराळं चित्र पाहायला मिळालं. नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकट करण्यासाठी एक ७२ वर्षीय सदाबहार मतदार मात्र पायाला भिंगरी लावून मतदान जनजागृती करतं आहे.
सोलापूरमधील चंदूभाई देडिया या ७२ वर्षीय अवलियाने लोकशाही बळकट करा म्हणून भर पावसात मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. लोकशाहीवर आपला विश्वास आहे असं सांगत सदृढ सरकार आणण्यासाठी प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून मतदान नक्की करायला पाहिजे अशी साद चंदूभाईंनी स्थानिक जनतेला घातली आहे. चंदूभाई हे भर पावसात सुद्धा ‘माझी प्रतिज्ञा, मी मतदार’ नावाचं फलक लावून शहरभर लोकशाहीचा जागर करत फिरत आहेत. चंदुभाई लोकशाहीचे खरे प्रहरी म्हणून आपलं आपली जबाबदारी निभावतांना दिसत आहेत.