पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय

Sex Racket
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये घरगुती आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा भारती विद्यापीठ पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली यानंतर त्यानी छापा टाकून हि कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी एका 50 वर्षाच्या महिलेला आणि एका 22 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. या प्रकरणातील महिला हि 22 वर्षीय तरुणीकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होती. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर हे करत आहेत.

काय आहे प्रकरण
कात्रज येथील संतोषनगर परिसरातील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची टीप भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली होती. घरगुती आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली हा वेश्याव्यवसाय सुरू होता.हि टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या घटनेची खात्री केली. यानंतर पोलिसांनी छापा टाकत 50 वर्षीय महिलेला व 22 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले आहे.

हि 50 वर्षीय महिला या 22 वर्षीय तरुणीकडून हा व्यवसाय करून घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या सेक्स रॅकेटमध्ये आणखी काही तरुणी गुंतल्या आहेत का? याचा तपाससुद्धा पोलिसांकडून करण्यात येत आहे अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधन घावटे यांनी दिली आहे.