शहापूर : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील शहापुरात दरोडेखोरांनी हैदोस घातला आहे. शहापूर तालुक्यातील वाशिंद या ठिकाणी दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा (Robbery) टाकला आहे. वाशिंदमधील शिवाजीनगर भागातील रहिवासी विनोद दांडकर यांच्या घरी चाकूचा धाक दाखवून दरोडा (Robbery) टाकण्यात आला. दरोडेखोरांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावेळी दरोडेखोरांनी श्रीसमर्थ कृपा आयुर्वेद व डायग्नोस्टीक सेंटर चोरट्यांनी फोडले आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहापुरात दरोडेखोरांनी घरात घुसून दागिन्यांची केली लूट, CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/Mb8Kz48H8M
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 5, 2022
वाशिंदमध्ये रात्री 2.30 च्या सुमारास पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी विनोद दांडकर यांच्या घरात घुसून चाकू सुऱ्याचा धाक दाखवून घरातील कपाटे फोडली. त्यातील सहा ते सात तोळ्याचे सोन्याचे दागिने सोबत चांदीचे दागिने आणि 30 हजारांची रोख रक्कम लुटून पसार झाले. तसेच त्यांनी थोड्याच अंतरावर असलेले तुषार पाटील यांचे आयुर्वेद व डायग्नोस्टीक सेंटर फोडून दोन सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीडीआर, व रोख रक्कम घेऊन पळून गेले.
यावेळी हे चोरटे पळून जात असताना शेजारच्या रहिवाशांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत वाशिंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाशिंद गावात वारंवार चोरी दरोड्याच्या (Robbery) घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे पण वाचा :
IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम
‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार
पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका