नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही महिन्यांनी T -20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकप आधी ऑस्ट्रेलियाच्या संघाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने T -20 वर्ल्डकप 2022 च्या फायनलमध्ये कोणते संघ असतील याची भविष्यवाणी केली होती. त्यावेळी त्याने 2022 च्या T -20 वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ असतील असे पॉटिंगने म्हटले होते. दरम्यान, पॉटिंगच्या भविष्यवाणी नंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील T-20 वर्ल्डकपबद्दल भविष्यवाणी केली आहे. फायनलमध्ये भारत नसून पाकिस्तानचा संघ जाईल असा दावा आफ्रिदीकडून करण्यात आला आहे.
नेमके काय म्हणाला शाहिद आफ्रिदी ?
यंदाच्या T -20 वर्ल्डकपची फायनल पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होईल. मात्र वर्ल्डकपचा चॅम्पियन कोण होईल याबाबत त्याने बोलणे टाळले आहे. पण पाकिस्तानचा संघ नक्कीच फायनलमध्ये स्थान मिळवेल असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी कोहलीची केली होती पाठराखण
शाहिद आफ्रिदीने कोहलीच्या खराब फॉर्मबाबत भाष्य करून त्याची पाठराखण केली होती. विराट कोहलीचा केवळ फॉर्म खराब असून त्याच्यामध्ये विक्रम करण्याची क्षमता असल्याचे आफ्रिदीने म्हटले होते. आगामी काळात कोहलीला धावा कराव्याच लागणार आहेत. त्याच्याकडून सर्वांना चांगल्या खेळीची अपेक्षा आहे, तो पुन्हा एकदा अव्वल स्थानाकडे कूच करेल असे मत शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले आहे.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?