मुंबई , बॉलीवुड | प्रियांका चोप्रा या अभिनेतीने अमेरिकी गायक नीक जोनस याच्याशी विवाह केला. मात्र माध्यमात काही वर्षापूर्वी झळकणाऱ्या बातमीला शाहीद कपूरच्या भावाने दुजोरा दिला आहे. प्रियांका चोप्रा आणि शाहीद कपूर यांच्यात प्रेमाचा गुत्ता होता असे शाहीद कपूर याचा भाऊ इशान खट्टर याने एका कार्यक्रमात म्हणले आहे.
शाहीद कपूरचे नाव फक्त प्रियांका चोप्रा हिच्या सोबतच जोडले जात नव्हते तर विद्या बालन आणि करिना कपूर यांच्या सोबत हि शाहिदचे प्रेम प्रकरण सुरु असल्याच्या बातम्या माध्यमात येत होत्या. शाहीद कपूर सोबत प्रियांका चोप्राचे प्रेम संबंध असण्यात अवाक होण्यासारखे काहीच नाही. दोघांच्या हलचाली वरून त्यांच्या बद्दल लोकांना असा संशय आलाच होता. मात्र बऱ्याच दिवसांनी या प्रेम संबंधाला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
इशानला एका कार्यक्रमात विचारण्यात आले कि शाहीद कपूरच्या गर्लफ्रेंडपैकी तुला सर्वात जास्त आवडलेली गर्लफ्रेंड कोणती. तर त्यावर इशानने उत्तर दिले कि हे सांगणे मला कठीण जात आहे. मात्र प्रियांका चोप्रा मला बेस्ट फ्रेंड वाटते.