‘Mirzapur’ फेम अभिनेत्याचे हृदयविकाराने निधन; गुड्डू भैय्याच्या सासऱ्याची साकारली होती भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे वयाच्या अवघ्या 56 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये ‘गुड्डू भैया’ (अली फजल)च्या सासऱ्याची भूमिका साकारली होती.

शाहनवाज प्रधान यांना शुक्रवारी अचानक त्रास होऊ लागलयाने त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाहनवाज एका कार्यक्रमासाठी गेले असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने कुटुंबियांच्या वतीने मुंबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाहनवाज यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

https://www.instagram.com/p/CmLq8GBLwnW/?utm_source=ig_web_copy_link

प्रसिद्ध अभिनेते राजेश तैलंग, ज्यांनी स्वतः ‘मिर्झापूर’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. ‘शाहनवाज भाई आखरी सलाम!!! किती अप्रतिम माणूस होतास आणि किती अप्रतिम अभिनेता होतास. मिर्झापूर दरम्यान मी तुझ्यासोबत किती सुंदर वेळ घालवला यावर विश्वास बसत नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.