Shahrukh Khan Injured : शाहरुख खानला शूटिंग दरम्यान दुखापत; उपचारासाठी थेट अमेरिकेला रवाना

Shahrukh Khan Injured
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shahrukh Khan Injured। बॉलीवूड विश्वातून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. बॉलीवूडचा किंग शाहरुख खानला शुटिंग दरम्यान मोठी दुखापत झाली… दुखापती इतकी गंभीर आहे कि उपचारासाठी शाहरुखने तातडीनं अमेरिका गाठलं आहे. सिद्धार्थ आनंदच्या ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खानला हि दुखापत झाली. एक्शन सीन करताना शाहरुख जखमी झाला आहे.

पायाला मार बसल्याचे बोललं जातंय- Shahrukh Khan Injured

याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या शूटिंग दरम्यान, ऍक्शन सिन करत असताना शाहरुखचा अपघात झाला, त्याच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. त्याच्या पायाला मार बसल्याचे बोललं जातंय. हि दुखापत फार अशी गंभीर नसली तरी शाहरुख टीमसोबत उपचारासाठी तात्काळ अमेरिकेला गेला आहे. या दुखापतीनंतर शाहरुखला त्याच्या कामापासून १ ते २ महिन्याचा ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाच्या शूटिंगचे पुढील वेळापत्रक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होऊ शकेल

ऍक्शन सीन करताना दुखापत (Shahrukh Khan Injured) होण्याची शाहरुखची ही काय पहिलीच वेळ नाही, याआधीही तो शूटिंग दरम्यान अनेक वेळा जखमी झाला आहे. आता १ ते २ महिने विश्रांती घेतल्यानंतर आणि दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यानंतरच शाहरुख खान सेटवर परतेल आणि त्याचे काम पूर्ण करेल असं बोललं जातेय.

किंग कधी रिलीज होणार?

बाकी, शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, निर्मात्यांनी ‘किंग’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नसली तरीहा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख अंडरवर्ल्डनी जोडलेल्या एका किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात तुम्हाला शाहरुखसोबत अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, सुहाना खान, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी, अर्शद वारसी आणि अभय वर्मा सारखे प्रसिद्ध कलाकार दिसतील