Monday, January 30, 2023

अजित पवारांना कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालावी; शालिनीताई पाटील यांचा हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यासहित राज्यातील 5 साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. हे सर्व कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे समजत आहे. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता या प्रकरणी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालाय. अजित पवार खोटं बोलत आहेत. असा आरोप त्यांनी केलाय.

अजितदादांवर आयकर विभागाच्या ज्या धाडी पडल्या आहेत, त्या जरंडेश्वरसाठीच पडल्या आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालाय. अजित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटी माहिती देत आहेत, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार कायद्याप्रमाणे झालेला नाही. असा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

सत्तेचा दुरुपयोग करुन कारखाना ताब्यात घेतला आहे. आयकर विभागानं माझ्याकडून लेखी स्वरुपात तक्रार अर्ज घेतलेला आहे. ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. साखर कारखाना लिलावात काढायची गरज नव्हती. कारखाना बुडीत नव्हता. आठ कोटीच्या ठेवी होत्या. त्यातून तीन कोटीची रक्कम फेडता आली असती. यांना कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी आता केंद्र सरकारनं आणि निवडणूक आयोगानं बंदी घातली पाहिजे, असंही पाटील म्हणाल्या.