कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोविड चाचणीचा सल्ला दिला आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांनी ट्विट करत सांगितले की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृहविलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असं मी आवाहन करतो.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करतो.
— Shambhuraj Desai (@shambhurajdesai) March 28, 2023
नुकतेच विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं यावेळी हे सर्वच नेते सभागृहात उपस्थित होते. त्यामुळं आमदारांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.