पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील उरुल विकास सेवा सोसायटीत तब्बल 50 वर्षांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या गटाने सत्तांतर केले आहे. सोसायटी निवडणुकीत पराभव झाल्याने राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला धक्का बसला आहे.
पाटण तालुक्यातील उरुल येथील सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विक्रमसिह पाटणकर यांचा गट तर त्यांच्या विरोधात शंभूराज देसाई यांचा गट उभा होता. सोसायटी निवडणुकीमुळे उरुल गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
उरूल सोसायटीत राष्ट्रवादीला धक्का; 50 वर्षांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या गटाची सत्ता pic.twitter.com/RgJ46bhvgL
— santosh gurav (@santosh29590931) March 21, 2023
दरम्यान, या निवडणुकीत पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील जगदंबा शेतकरी ग्रामविकास पॅनेलने 13- 0 असा विजय मिळवला. पाच गावाचे कार्यक्षेत्र असलेल्या या सोसायटीत पहिल्यादांच शंभूराज देसाई यांच्या गटाला सत्ता मिळवण्यात यश मिळाले. तर पाटणकर गटाला पराभवाचा सामना करावा लागला.