सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात दोन दिवसात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतजमिनीचे तत्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
सातारा जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अवकाळी पावसाची माहिती घावी. तसेच नुकसानग्रस्त शेतजमिनीची पाहणी करुन तत्काळ पंचनामे करावेत. तसेच झालेले पंचनाम्याचा अहवाल शासनास सादर करावा, असे मंत्री देसाई यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.