व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

तानाजी सावंत अनावधानाने बोलले, आता हा विषय संपला पाहिजे- शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई याना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत अनावधानाने बोलले, आता त्यांनी याबाबत माफीची मागितले आहे त्यामुळे हा विषय संपला पाहिजे असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल. ते सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

तानाजी सावंत यांनी आपल्या वक्तव्यावरून माफी मागितली आहे. मी अनावधानाने तस बोललो माझा तो उद्देश नव्हता असं म्हणत त्यांनी १०० वेळा मराठा समाजाची माफी मागितली आहे. अनावधानने चुकून त्यांच्याकडून असं वक्तव्य आलं, ते काय जाणीवपूर्वक बोलले नव्हते. आता त्यांनी माफी मागितल्यानंतर तो विषय संपला पाहिजे असं म्हणत शंभूराज देसाई यांनी या विषयावर पडदा टाकला.

नेमक्या कोणत्या विधानावरून वाद??

उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणावरून भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले “मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला.