कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
संजय राऊतांच्या नादाला उद्धव ठाकरे लागल्यामुळे त्यांच्या सोबतचे ५० आमदार त्यांना सोडून गेले. येत्या काळात आहेत ते १५ आमदार उद्धव ठाकरेंना सोबत ठेवायचे असतील तर त्यांनी अजून सुद्धा यातून काहीतरी बोध घ्यावा आणि संजय राऊत यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन राहावं अशी टीका उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. ते कराड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी ३ वेळा ४ लाख मतदार असलेल्या मतदारसंघातून निवडून आलो आहे. संजय राऊतांनी मला काय बोलायच्या आगोदर एखाद्या ग्रामनपंचायत किंवा नगरपालिकेच्या वार्डातून निवडून येऊन दाखवावे. संजय राऊत याना राज्यसभेला मते दिली आहे. आमच्याच मतांवर ते निवडून आले आहेत. त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे खुलं आव्हानही शंभूराज देसाई यांनी दिले.
उध्दव ठाकरेंनी संजय राऊतांपासून अंतर ठेवावं, अन्यथा…; शंभूराज देसाईंचा इशारा#Hellomaharashtra @DesaiShambhuraj pic.twitter.com/CDbvv3Gw1A
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 4, 2023
दरम्यान, काल संजय राऊतांनी साताऱ्यात जाऊन दोन्ही राजेंवर टीका केली होती. त्यावरूनही शंभूराज देसाई यांनी निशाणा साधला. संजय राऊत यांना साताऱ्यात येवूच द्यायला नको पाहिजे होते. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बद्दल दोन वर्षांपूर्वी छ. शिवाजी महाराजांचे वारसदार असल्याचे पुरावे मागितले होते. अशा प्रकारचं गंभीर विधान करणारे संजय संजय राऊत पुन्हा साताऱ्यात येतात आणि छत्रपती घराण्याला उपमा देतात हे सहन होण्यासारखे नाही. याबाबतीत सातारकरांनी निश्चित विचार करण्याची गरज आहे असं सुद्धा त्यांनी म्हंटल.