Shambhuraj Desai : हायप्रोफाईल आत्महत्या प्रकरणात मंत्री शंभुराज देसाईंचे नाव? हाताचे बोट कापून थेट फडणवीसांना पाठवल्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. सातारा जिल्ह्यातील फलटण
तालुक्यात घडलेल्या घटनेच्या २० दिवसांनंतरही पोलिसांकडून चौकशीत दिरंगाई केली जात असल्याने नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी ऑन कॅमेरा आपले बोट छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली असून दोघांकडून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची कान उघडणी करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आत्महत्या केलेल्या नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी आपले बोट छाटून त्याचा व्हिडीओ तयार करत तो थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविला आहे. दरम्यान, स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहलेल्या आत्महत्या पूर्वीच्या सुसाईड नोटमध्ये थेट कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह काही व्यक्तीकडून मानसिक स्वरूपात त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर धनंजय ननावरे यांनी नंदकुमार ननावरे व वहिनीच्या प्रकरणाची २० दिवस उलटून देखील चौकशी तसेच पुढील तपास हा जलद गतीने केला जात नसल्याने आता दररोज शरीराचा एक एक अवयव तोडून तो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणार असल्याचा इशारा दिला आहे.

एकंदरीत फलटण तालुक्यातील उल्हासनगरमध्ये ननावरे दांपत्याने केलेली आत्महत्येवरून पोलिसानी जरी चार ते पाच जणांना अटक केली आहे. तरी पुढील तपास गतीने केला जात नसल्यामुळे धनंजय ननावरे यांनी आपल्या हाताची बोट छाटून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठविली असल्याने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणावरून देसाईंच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर दोन्ही उपमुख्यमंत्री काय कारवाई करणार? हे पहावे लागणार आहे.

मंत्रालयात बंद दाराआड 45 मिनिटे नेमकं काय घडलं ?

मुंबईत मंत्रालयात शुक्रवारी कॅबिनेटची बैठक पार पडल्यानंतर या प्रकारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. दोघांच्यात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीश महाजन यांच्यात मंत्रालयात बंद खोलीत तब्बल ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही बोलवण्यात आलं. त्याठिकाणी मंत्री देसाईंना या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी जाबही विचारला. तसेच सर्वांसमोर देसाईंना जवळपास अर्धा तास चांगलेच झापले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावरून शंभूराज देसाईंची कानउघडणी केली.

पहिली अडीच वर्षे राज्यमंत्री नंतर बढती

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात पहिल्या टर्ममध्ये शिवसेना आमदार म्हणून शंभूराज देसाई यांना गृहराज्यमंत्री पद मिळाले. त्यांना मंत्रिपदाबरोबरच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही हवे होते. परंतु, राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांना सहकार खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने आपसूकच पालकमंत्रीपदही त्यांच्याकडेच गेले. अडीच वर्षानंतर शिंदे गट महाविकास आघाडीतून फुटून भाजपबरोबर सत्तेत बसला. त्यानंतर शंभूराज देसाई कॅबिनेट मंत्री झाले. चांगल्या खात्यासाठी ते प्रयत्नशील होते. तरीही त्यांना उत्पादन शुल्कसारखे खाते मिळाले. कॅबिनेट मंत्रिपदाबरोबर त्यांना सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मिळाल्याने शंभूराज देसाई जाम खूश होते.

‘या’ अनेक प्रकरणावरून शंभूराजे चर्चेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे राज्यात शंभूराजेंचा दरारा वाढला. सचिवांपासून कलेक्टर ते तहसीलदार, पोलीस अधीकार्‍यांवर त्यांनी वचक निर्माण केला. मंत्रिपदामुळे त्यांचा अहंकार देखील वाढला. हा अहंकरच त्यांना अनेकदा अडचणीचा ठरला आहे. पालकमंत्रीपद असताना ठाणे जिल्ह्यात बरेच दिवस न फिरकल्याने राजकीय कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हरवल्याचे बॅनर लावले होते. त्यानंतर राजकीय विषयांवर मीडियाला बाईट देताना अनेकदा त्यांनी वाद ओढवून घेतले. पोवई नाक्यावरील इमारतीवर उदयनराजेंचे चित्र रेखाटण्यास विरोध, पोवई नाक्यावरील शिवतीर्थ परिसरात लोकनेत्यांचे स्मारक उभारण्याचा अट्टहास, अशा घटनांमध्ये शंभूराज देसाईंनी उदयनराजेंशी पंगा घेतला. त्यामुळे शंभूराजे सतत या ना त्या वादात राहिले. आता उल्हासनगरमधील दाम्पत्याच्या आत्महत्येचे प्रकरण शंभूराज देसाई यांच्यावर शेकत चालले आहे. त्यांच्या कथित भुमिकेबद्दल कॅबिनेटच्या बैठकीत देखील जोरदार घमासान झाल्याची बातमी बाहेर फुटली आहे.