सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आकडे सुद्धा म्हणता येत नाहीत तसंच लोकसेवा आयोगाला निवडणुक आयोग म्हणतात, असा टोला राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कालच्या वज्रमुठ कार्यक्रमात लगावला होता. यावर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांची ‘स्लिप आॅफ टंग’ होऊ शकते. अजितदादांची सुद्धा ‘स्लिप आॅफ टंग’ झाली होती. धरणात पाणी नाही तर काय करु? असा प्रश्न विचारणारा उपमुख्यमंत्री आम्हाला मिळाला होता असे आम्ही विचारु शकतो, असा टोला मंत्री देसाई यांनी लगावला.
साताऱ्यात आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला.. यावेळी ते म्हणाले की, धरणातील वक्तव्याबाबत अजितदादांनाही माफी मागावी लागली होती. हे त्यांना चागंलेच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी बोलताना जरा जपून बोलावे.
अजित पवारांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर; केला थेट धरणाच्या 'त्या' वक्तव्याचा उल्लेख pic.twitter.com/y3jrUab08X
— santosh gurav (@santosh29590931) May 2, 2023
आज आदरणीय शरद पवार साहेबांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या चरित्रामध्ये पहाटेच्या शपथविधी बाबत काय लिहिलय यावर अजितदादांनी बोलावं. अशा प्रकारच्या छोट्या गोष्ठीबाबत असं बोलत बसण्यापेक्षा एकनाथ शिंदेंच्या चांगल्या कामाबाबत अजितदादा बोलत नाहीत, असे मंत्री देसाई यांनी यावेळी म्हटले.