मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचा 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जगातील संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी हि एक धक्कादायक बातमी आहे.
दिग्गज शेन वॉर्न यांना ऑस्ट्रेलियाचा महाग लेगस्पिनर म्हणून ओळखले जाते. जगातील क्रिकेट इतिहासात शेन वॉर्न यांना महान बॉलरपैकी एक मानले जाते. आतापर्यंत त्यांच्या नावावर क्रिकेट विश्वात अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.
कर्णधार बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे
शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शेन वॉर्नने जानेवारी 2007 मध्ये सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर शेन वॉर्नने 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधार पदापर्यंत मजल मारली मात्र त्यांना कर्णधार होण्याची संधी कधीच मिळाली नाही. त्यानंतर शेन वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्यांनी प्रथमच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच सत्रात राजस्थान रॉयल्सला आयपीएलचे चॅम्पियन बनवले.