हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके याची बदली करण्यात आल्याने त्यांच्याजागी आता नव्या मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर खंदारे हे कराडचे नवे मुख्याधिकारी म्हणून आता काम पाहणार आहेत.
कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली झाल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा तात्पुरता पदभार हा संजीवनी दळवी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आता वसई-विरार महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर खंदारे यांची नियुक्ती कराडच्या नव्या मुख्याधिकारीपदी करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या नगररचना विभागाच्या मार्फत कराडच्या मुख्याधिकारीपदाची ऑर्डर आज प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार आज कराडच्या मुख्याधिकारीपदी शंकर खंदारे यांची बदली करण्यात आली आहे. लवकरच ते कराडला रुजू होतील.