शरद पवार -अमित शहा यांच्यात गुप्त बैठक? प्रफुल्ल पटेलही सोबतीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू, परमबीर सिंग यांच लेटरबॉम्ब यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून आता त्यातच आता अहमदाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे. दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे.

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूनीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर होण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही गोष्ट फेटाळून लावली आहे. शरद पवार आणि अमित शहा यांच्यात अशी कोणतीही भेट झाली नसून ही अफवा पसरवण्यात आली आहे असं नवाब मलिक यांनी म्हंटल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like