शरद पवार कधी कोणाला भेटतील याचा नेम नाही; पवार – शहा भेटीवर राणेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पवार – शहा भेटीने राजकिय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. यावर निलेश राणे यांनी शरद पवार कधी कोणाला भेटतील याचा नेम नाही असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार साहेब जर अमित शहा साहेबांना भेटले तर त्यात नवल वाटायचं कारण नाही असं राणे यांनी म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून राणे यांनी आपले मत मांडले आहे. शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा नेम नसतो. शरद पवार ते आहेत जे शिवाजी पार्कला स्व. बाळासाहेबांचे स्मारक होत आहे ती जागा एनसीपी कार्यालय करतील आणि एनसीपी कार्यालय बाळासाहेबांचे स्मारक करतील असं ट्विट राणे यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही गोष्ट फेटाळून लावली आहे. शरद पवार आणि अमित शहा यांच्यात अशी कोणतीही भेट झाली नसून ही अफवा पसरवण्यात आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे.असं नवाब मलिक यांनी म्हंटल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like