भाजप विरोधी एकजूट करण्यासाठी देशातील राजकीय परस्थितीवर शरद पवार- प्रशांत किशोर यांच्यात चर्चा : नवाब मलिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील भाजपाच्या सर्वविरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा शरद पवार यांची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत, त्यामुळे देशातील राजकीय परिस्थिती काय याची माहीती शरद पवार यांना दिल्याची माहीती अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

शुक्रवारी जवळपास साडेतीन तास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर चर्चा झाली. देशाच्या राजकारणात या दोघांच्या भेटीची मोठी चर्चा होत आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्यावेळी शरद पवार जाणार होते. परंतु आता भाजपाला एक सशक्त पर्याय देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

Leave a Comment