हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली असून पुन्हा एकदा शिवसेना- भाजप युती होणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसहित घटक पक्षातील दोन्ही काँग्रेस नाराज असल्याचे समजत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे वर्षा वर गेल्याच समजत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं कळतं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना नक्की काय म्हणायचं होतं, किंवा त्यांच्या मनामध्ये काय सुरु आहे. हे जाणून घेण्याच्या उद्देशानेचं संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान,आजची भेट ही राजकीय भेट नव्हती. बरेच जण महाविकास आघाडी सरकार मध्ये येतील अस म्हणत राज्यातील सरकार आपली 5 वर्ष पूर्ण करतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री काल औरंगाबादमध्ये काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला.