हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्र्पती पदासाठी निवडणूक पार पडत आहे. यात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मर्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
दिल्लीत खा. शरद पवार यांच्या घरी विरोधकांची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपराष्ट्र्पती पदासंदर्भात कोणाला उमेदवारी द्यायची? याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी देशाच्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एकमताने मार्गरेट अल्वा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
https://www.facebook.com/PawarSpeaks/videos/live-now/557127416145901
मार्गारेट अल्वा या अनेक वर्ष राज्यसभेच्या खासदार होत्या तसेच त्यांनी राज्यपाल म्हणूनही काम पाहिले होते. त्यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. संसदीय कामकाजाचीही त्यांना अत्यंत उत्तम माहिती असल्याकारणाने आम्ही त्यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे.
या उमेदवाराला पाठींबा देणाऱ्यांमध्ये काँग्रेस, डीएमके, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, शिवसेना, टीआरएस, आरएसपी, व्हीसीके तसेच अनेक पक्षांचा सहभाग आहे. आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्या पत्रकार परिषदेत व्यस्त होत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही, असे पवार यांनी सांगितले.