व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात; शिवसेनेचं बंड हाताळणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिंदेंच्या बंडा मुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकार वाचवण्यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे चाणक्य शरद पवार मैदानात उतरणार असून शिवसेनेतील बंड हाताळणार असल्याची माहिती मिळत आहे.

आज मुंबईतील वाय बी सेंटर मध्ये शरद पवार, संजय राऊत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, यांच्या उपस्थित बैठक पार पडली. यापुढील सर्व रणनीती शरद पवारांच्या सूचनेनुसार होईल. शरद पवार स्वतः महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मैदानात उतरतील. आणि शिवसेनेतील बंड मोडून काढतील.

दरम्यान, या बैठकीनंतर शिवसेना खासदार यांनी प्रतिक्रिया देत म्हंटल की, याच वाय बी सेंटर मधून महाविकास आघाडीचा जन्म झाला होता. आता कोण जिंकते ते सभागृहात पहाच. हम हार मानने वाले नही, सरकार पुढील अडीच वर्षे चालेल असा इशारा राऊतांनी बंडखोरांना दिला.

शरद पवार यांना मोठा राजकीय अनुभव आहे. शरद पवार महाविकास आघाडीचे शिल्पकार होते. 2019 ला महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वीच अजित पवारांनी केलेलं बंड पवारांनी अवघ्या 3 दिवसांत फोडल होत. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले असून शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे.