हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र तरीही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंची सुरक्षा नाकारली असा गंभीर आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला. तसेच तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. त्याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण घडामोडींबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता एकनाथ शिंदेंना झेड सिक्युरिटी आधीही होती आणि आताही आहे अस स्पष्टीकरण पवारांनी दिले.
“सुरक्षा कुणाला द्यायची आणि का द्यायची हा निर्णय घेण्यासाठी राज्याचा मुख्य सचिव,आणि पोलिस अधिकाऱ्यांची एक समिती असते ते निर्णय घेत असतात. आज माझी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट झाली होती. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. याशिवाय गडचिरोलीचे काम त्यांच्याकडे असल्याने त्यासाठी अॅडशनल फोर्स त्यांना दिली होती. त्यामुळे यावर अधिक चर्चांची गरज वाटत नाही. अस शरद पवारांनी म्हंटल.
दरम्यान, मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री केलं असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं, त्याबाबत विचारलं असता त्यांनी दगड छातीवर ठेवू की डोक्यावर ठेवू आम्हाला काय त्याचं? त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे.” असं शरद पवार म्हणाले. तसेच मुलांबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देत नाही असं म्हणत पवारांनी नितेश राणेंच्या आरोपांवर टोला लगावला.