मुंबई प्रतिनिधी | येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून हद्दपार करण्यासाठी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी सगळ्या पक्षांचं ऐक्य घडवून महाआघाडी स्थापन करण्याबाबत प्रयत्न सुरु केले आहे. मात्र नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदासाठी पर्याय कोण यावर महाआघाडीचे भवितव्य ठरले असून, जर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे किमान 25 खासदार निवडून आले तर शरद पवार हे देशाचे पुढील पंतप्रधान होऊ शकतील अशी माहिती समोर आली आहे.
याच मुख्य कारण म्हणजे देशातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत असलेले घनिष्ठ संबंध. राजकारणाचा दांडगा अनुभव, विविध पक्षांना एकत्र ठेवण्याची कसब, ही शरद पवारांसाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे महाआघाडी झाल्यास पंतप्रधान पदाच्या नावासाठी त्यांच्यावर विरोधीपक्षांमध्ये एकमत होऊ शकते. पण पवारांना काँग्रेस कितपत पाठिंबा देऊ शकेल याबद्दल शंका आहे. मात्र इतर पक्षांचा दबाव आल्यास पर्याय म्हणून काँग्रेसही शरद पवारांना पंतप्रधान बनवण्यासाठी राजी होऊ शकते. मात्र पवारांच्या विश्वसनियतेबद्दल कायम शंका व्यक्त केली जाते. मात्र सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे किमान 25 खासदार निवडून आले तरच त्यांची दावेदारी प्रबळ ठरू शकते. अशी माहिती सूत्रांद्वारे प्राप्त झाली आहे.
दरम्यान, ‘देशात कॉँग्रेस आणि भाजप हे दोनच प्रमुख पक्ष आहेत. काँग्रेसचे मत विचारात घेतल्याशिवाय देशात पंतप्रधान ठरविता येणार नाही. कॉँग्रेसशिवाय नव्या पर्यायाचा विचारही करता येणार नाही,’ अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला होता. तर दुसरीकडे काँग्रेसचे सरकार असताना शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकत होते. मात्र त्यावेळी शरद पवार यांना जाणीवपूर्वक बाजूला सारण्यात आले. काँग्रेसनेच त्यांना डावलले, त्यामुळे ते पंतप्रधान बनू शकले नाहीत; पण आता यापुढे ते पंतप्रधान बनतील याची शक्यता नाही. असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?