… तर कांदा उत्पादक शेतकरी वाचू शकेल; शरद पवारांनी सुचवला ‘तो’ पर्याय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांद्याच्या दरात मोठी घसरण झालयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे. नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, अद्यापही खरेदी केंद्र सुरु झाली नाही. त्यामुळे नाफडेकडून कांद्याची खरेदी कधी सुरु होणार? असा प्रश्न पडला असताना याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी एक पर्याय सुचवला आहे. “कांदा उत्पादकांचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर शेतकऱ्यांचा कांदा नाफेडने खरेदी करावा. त्यांनी काढ्याची खरेदी केली तर शेतकरी वाचू शकेल, असे पवार यांनी म्हंटले आहे.

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतात घेत असलेलया शेतमालास किती दर मिळाला आहे. हे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? किती रुपयांनी वाढले यासोबतच सर्वाधीक भाव कुठे मिळत आहे यानुसार आपण आपला शेतमाल विक्री करून अधिक नफा कमावू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

खा. शरद पवार यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कांदा उत्पादकांच्या परिस्थितीबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी नाफेड नावाची संस्था आहे. ज्यावेळेला शेतीमालाचे भाव पडतात त्यावेळेला नाफेड बाजारात खरेदीसाठी उतरते. या ठिकाणीही नाफेडने खरेदी करावी. नाफेडने कांद्याची खरेदी केली तर कांदा उत्पादक शेतकरी वाचू शकेल.

कांदा उत्पादक शेतकरी प्रामुख्याने जिरायत शेतकरी असतो. आणि त्याचे एकच पीक असे आहे कि पैसे देणारे. आज अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी हे संकटात आहेत. त्यामुळे त्यांना संकटातून बाहेर काढायचे असेल तर त्याच्याकडून केंद्र व राज्य सरकारने कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी गेली काही दिवस केली जात आहे. यावर त्यांनी खरेदी सुरु केली असल्याचे सांगितले गेले. मात्र, कालपर्यंत खरेदी सुरु झालेली नव्हती, असे पवार यांनी म्हंटले.

फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली होती. एफपीओंची (FPO) जी दहा केंद्रे सुरु आहेत, त्यापैकी काही केंद्रे ही बाजार समित्यांमध्ये सुरु करण्याचे निर्देश देऊ, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते.