सर्वात मोठी बातमी!! शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?? हालचालींना वेग

Sharad Pawar Group Congress
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीनंतर आता शरद पवारांचा गट (Sharad Pawar Group) काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थिती शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडने पवारांपुढे ठेवला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे समजते. त्यामुळे शरद पवार मोठा निर्णय घेणार का हे आता पाहायला हवं. (Sharad Pawar Group to Merge In Congress)

अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम यांच्यासहित काँग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित होते. याच बैठकीत चेन्नीथला यांनी पवारांना त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याची विनंती केल्याची चर्चा आहे. यानंतर शरद पवार याच्या गटाकडून या बातमीचे खंडन करण्यात आलं असले तरी आजच पवारांनी पुण्यात पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर प्रथमच पवारांनी बैठक बोलावली आहे. खासदार श्रीनिवास पाटील,सुप्रिया सुळे,अमोल कोल्हे, वंदना चव्हाण या खासदारांसह आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे, अशोक पवार, अनिल देशमुख हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत .या बैठकीत काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो. या बैठकीतून बाहेर पडलेल्या शरद पवार एका गटाच्या मंगलदास बांदल यांनी पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत चर्चा सुरु असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळे शरद पवार आज मोठा निर्णय घेतात का याकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे.