बारामती | शरद पवार साहेबांना महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिल आहे. पण विरोधात असताना महाराष्ट्राने सर्वात जास्त प्रेम दिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलंय की, शरद पवार सत्तेत विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात. त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहीत नाही, काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं. त्याच्या या विधानामुळे आता पुन्हा राजकीय विरोधक शरद पवार व सुप्रिया सुळेसोबत राष्ट्रवादीवर हल्लाबोल करती.
खा. सुप्रिया सुळे या इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री, आ. दत्तात्रय भरणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते, महाविकास आघाडी सत्तेत येईल. राष्ट्रवादी काॅंग्रेस संपला असे सगळे म्हणत होते. एक वेळ अशी होती, दररोज कोणना- कोण पक्ष सोडत होते. अन् एखादा दिवस पक्ष कोणी सोडला नाही, आम्ही म्हणायचो हुश्श… आज कोणी पक्ष सोडला नाही. इतके लोक पक्ष सोडून जात होते की त्याला हिशोबच नव्हता. दोन्ही खिसे रिकामे झाले होते, परंतु सोलापूरला साहेब गेले अन् जी कुस्ती सुरू झाली ती निकाला दिवशीच संपली.
शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारणात 55 वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक चढ उतार पाहिले. जेवढे चढ आले, तेवढेच उतारही त्यांच्या अनुभवाला आले. 27 वर्ष सत्तेत आणि 27 वर्ष विरोधात गेली. राजकारणात काय होते, काय जाते हे आमच्यापेक्षा कोणी जवळून पाहिलेलं नाही, असेही मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.