कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्वात मोठ्या भूकंपानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कराड मध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या स्वागतासाठी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी करत आपला पाठिंबा दर्शवला आहे.
आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने शरद पवार यांनी आपले राजकीय गुरू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ जाऊन अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील, आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील आणि सुपुत्र रोहित पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
#WATCH | NCP chief Sharad Pawar and senior Congress leader Prithviraj Chavan pay floral tribute to former Maharashtra CM Yashwantrao Chavan in Karad, Maharashtra. pic.twitter.com/40IZNV5Ch9
— ANI (@ANI) July 3, 2023
शरद पवार यांच्या स्वागताला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. आज सकाळपासूनच शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पाऊले प्रीतिसंगमाकडे वळत होती. संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाल्याचे पाहायला मिळालं. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आता पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. देशभरात विरोधी पक्ष संपवण्याचे काम सुरु आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. फोडाफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले. मात्र राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे असा इशारा शरद पवारांनी यावेळी आपल्या छोटेखानी भाषणात दिला आहे.