हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याबाबत राज्यात मात्र, अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, या भेटीदरम्यान खुद्द शरद पवार यांनी अमित शाह यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचे निमंत्रण दिले असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार अमित शाह सप्टेंबरमध्ये एका कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत भाजपच्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात या भेटीची चांगलीच चर्चा झाली. मात्र, शाह यांची भेट सहकार मुद्द्यावर घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदा भेट घेतली होती. त्यानंतर पवारांनी साखर कारखाने आणि सहकाराशी संबंधित विषयावर शाह यांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केली.
अमित शाह यांच्याशी ज्यावेळी भेटीदरम्यान पवारांनी चरचा केली त्यावेळी शाह यांनी आपण पुणे येथील दौरा सप्टेंबर महिन्यात करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आवर्जून भेट देण्याची विनंती करत निमंत्रण पवारांनी शाह यांना दिले आहे.