मुंबई | “शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत; पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही” असे म्हणणर्या भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये असे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकर यांच्या असा टोला पवारांनी आंबेडकरांना लगावला आहे. मुंबईच्या नेहरू सेंटर येथे चित्रकार भारत सिंह यांच्या तैलचित्रांच्या प्रदर्शनाला आज पवार यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पवार यांनी आंबेडकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
संभाजी भिडेंची पिलावळ ‘राष्ट्रवादी’ मध्ये अधिक आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भिडेंची बाजू घेतात. मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसे जाणार?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. शरद पवार यांनी आज त्याला प्रत्युत्तर देत आंबेडकर यांच्यावर निशान साधला.
अकोला जिल्ह्यात दोन वेळा आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली होती, असा खुलासा पवार यांनी यावेळी केला. तसेच अकोला येथे त्यांच्या प्रचाराला मी गेलो नव्हतो तर माझे कार्यकर्ते प्रचाराला उभे होते. मग ते धर्मनिरपेक्ष नव्हते का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.