हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फॉक्सकान सेमिकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य्क्ष शरद पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. वेदान्त फॉक्सकॉइन प्रकल्प राज्याबाहेर जाणे दुर्दैवी आहे. तसेच हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता नाही असं स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
आज पुण्यात शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाष्य करत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. वेदांत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येईल याबाबत मला तरी काही आशा नाही. काही लोकांनी सांगितलं की, हा निर्णय बदलावा आणि परत हा प्रकल्प महाराष्ट्रात आणावा परंतु हे काही आता होणार नाही.
खरं तर हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जायला नको होता. पण तो गेला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही असे शरद पवार यांनी म्हंटल. वेदांत पेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आणू, असे सांगणे म्हणजे लहान मुलांची समजूत काढण्यासारखे आहे, हे तर रडणाऱ्या लहान मुलाला फुगा दाखवण्यासारखं आहे असा टोलाही शरद पवारांनी राज्य सरकारला लगावला. महाराष्ट्र नेहमी गुंतवणूकीच्या बाबतील एक नंबरला असायचा, काही नेते आणि अधिकारी हे नेहमी गुंतवणूक कशी येईल याकडे लक्ष द्यायचे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राज्यकर्त्यांचे राज्याकडे लक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय असं म्हणत शरद पवारांनी शिंदे- फडणवीसांवर निशाणा साधला