शरद पवारांची कोरोनावर मात; ट्विट करत दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. शरद पवार यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी आज निगेटिव्ह आहे. माझ्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी मी माझे डॉक्टर, मित्र, सहकारी आणि हितचिंतकांचा आभारी आहे.असे ट्विट शरद पवार यांनी केलं

शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते घरीच उपचार घेत होते. अखेर आज त्यांनी कोरोनावर मात केली आहे. शरद पवार हे त्यांच्या लढाऊ वृत्ती साठी ओळखले जातात