हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कुस्तीगीर परिषदेचा राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याबरोबर बाळासाहेब लांडगे यांनीही राजीनामा दिल्यानंतर परिषदेची सर्व सूत्रे नागपूरचे खासदार रामदास तडस यांच्याकडे आली आहेत.
पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये झालेल्या तातडीच्या बैठकीत राजीनामाबाबत माहिती देण्यात आल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात घेण्याची घोषणा केली होती. त्यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीवेळी शरद पवार आणि बाळासाहेब लांडगे यांनी पदाचे राजीनामे दिल्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आणि त्याबाबतचे पत्र भारतीय कुस्ती महासंघालाही देण्यात आले. क्रीडा क्षेत्रात नवीन कायदा आला असून त्यानुसार 80 वर्षावरील व्यक्ती संघटनेच्या पदावर राहू शकत नाही. या नवीन कायद्याची कुस्ती महासंघाने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणांमुळे शरद पवार, बाळासाहेब लांडगे, नामदेवराव मोहिते, संभाजी पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.